दिवाळी म्हणजे आत्मप्रकाशाचा उत्सव :– राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय “प्रभू प्रासाद”म्हसरूळ, नाशिक येथे “दीपावली” विशेष कार्यक्रम उत्साहात संपन्न
नाशिक– दिवाळी म्हणजे फक्त बाह्य प्रकाश नव्हे, तर आत्मप्रकाशाचा उत्सव आहे. प्रत्येकाने आपल्या अंतःकरणातील दिवा प्रज्वलित करून परमात्म्याशी जोडले गेले पाहिजे. कारण खरा आनंद आणि संपन्नता ही अंतर्मनातील शांतीतूनच प्राप्त होते असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्माकुमारी संस्थेच्या उपक्षेत्रीय मुख्य संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदींजी यांनी केले. यावेळी दीपावलीचे आध्यात्मिक महत्त्व उलगडत सर्वांना शांतता, समृद्धी व सद्भावना यांचे संदेश देत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
दिनांक 21रोजी लक्ष्मीपूजन निमित्त “प्रभू प्रासाद”, जिल्हा मुख्य सेवा केंद्र येथे “दीपावली” विशेष कार्यक्रम राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी माउंट आबू मुख्यालय येथून राजयोगी ब्रह्माकुमार जितूभाई, भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार, योग विद्या गुरुकुलचे उपाध्यक्ष योगाचार्य गंधार मंडलिक, मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष नाशिकचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चैतन्य बैरागी, पत्रकार श्रीकांत बेनी, एल.आय.सी. विकास अधिकारी अनंत बोडके, जिल्हा मुख्याध्यापक संघ अध्यक्ष गोरख कुनगर, दै.सकाळचे संपत देवगिरे, दै.लोकमंथन संपादक योगेश रोकडे, पत्रकार मुकुंद पिंगळे, ज्ञानेश्वर उगले आणि महिरावणी विद्यालयाचे उपशिक्षक समाधान शेवाळे तसेच ब्रह्माकुमारी शक्ती दीदी, ब्रह्माकुमारी विना दीदी, ब्रह्माकुमारी मनीषा दीदी, ब्रह्माकुमारी ज्योती दीदी, ब्रह्माकुमारी मंगल दीदी, ब्रह्माकुमारी पुष्पा दीदी, ब्रह्माकुमारी उज्वला दीदी, डॉ .राजेशभाई वरिष्ठ राजयोग शिक्षक ब्रह्माकुमार सुरेश साळुंखेसर आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते दिवाळीनिमित्त दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.*
यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांनीही मेडिटेशन आणि योगाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी ब्रह्माकुमारी संस्थेच्या अध्यात्मिक आणि सामाजिक कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले. यावेळी राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी यांना त्यांच्या अध्यात्मिक, सामाजिक कार्याबद्दल “जीवनगौरव पुरस्कार” मिळाल्याबद्दल संपूर्ण ब्रह्माकुमारी परिवाराच्यावतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. तसेच बीके. बाळासाहेब सोनवणेसर यांचा वाढदिवस व “दिव्यांगरत्न व समाजभूषण” पुरस्कारप्राप्ती निमित्त ब्रह्माकुमारी वासंती दीदी यांच्या शुभहस्ते शाल, पुष्पगुच्छ, शिवबाबांची प्रतिमा व टोली देत सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अतिशय सुंदररित्या सूत्रसंचालन जिल्हा वरिष्ठ राजयोग शिक्षिका ब्रह्माकुमारी पूनम दीदींनी केले, तर स्वागत ब्रह्माकुमारी ज्योती दीदी आणि ब्रह्माकुमारी मंगल दीदींनी केले.
कार्यक्रमात कुमारी शिवानीच्या स्वागत नृत्याने उपस्थित समुदाय भाराऊन गेले. यावेळी मोठ्या संख्येने ब्रह्माकुमारी साधक बंधूभगिनी उपस्थित होते.

















