

जेलरोड (नाशिक) – येथील अमित मेडिकल तर्फे दिनांक ७ सप्टेंबर रोजी लकी ड्रॉ सोडत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राजयोगिनी ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी, साप्ताहिक ‘नाशिक परिसर’चे संपादक ब्रह्माकुमार दिलीप बोरसे, डॉ. अमोल सुपे , चंचल बोंडे, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अमित मेडिकलचे संचालक अमित कवडे यांनी केले.
मनोगत व्यक्त करताना ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी म्हणाल्या की, “प्रत्येकाचे भाग्य भगवंताने बनवूनच पाठवलेले असते. येथे उपस्थित सर्वजण भाग्यशालीच आहेत. लकी ड्रॉ जिंकला म्हणूनच कोणी भाग्यशाली होत नाही, तर प्रत्येक व्यक्ती आपल्या श्रेष्ठ कार्यामुळेच जीवनात यश व समाधान प्राप्त करतो.” अमित मेडिकलने ग्राहकांसाठी विविध उपक्रम आयोजित करून समाजकार्यातही योगदान दिले असून, त्यांच्या या कार्यास शुभेच्छा दिल्या.


संपादक ब्रह्माकुमार दिलीप बोरसे यांनी सुरुवातीला तीन वेळा ‘ओम शांती’ म्हणण्याचा आध्यात्मिक अर्थ स्पष्ट केला. “प्रत्येक मनुष्यात्मा हा मूळतः शांतस्वरूप आहे. परंतु बाह्य संस्कारांमुळे तो आपल्या मूळ स्वरूपाला विसरतो. जर आपण मूळ संस्कारांमध्ये स्थित राहून भगवंताची आठवण केली, तर खरी शांती नक्कीच मिळते,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
संचालक अमित कवडे म्हणाले की, “मागील काही वर्षांपासून अमित मेडिकल केवळ औषधे आणि आरोग्य सेवा पुरवित नाही, तर सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांतही सक्रीय आहे. आजचा कार्यक्रम आमच्या याच वचनबद्धतेचा एक भाग असून, विजेत्यांचे अभिनंदन करण्याचा आम्हाला विशेष आनंद आहे. भविष्यातही असेच उपक्रम आयोजित करत राहू.”
कार्यक्रमात विजेत्यांना विविध आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली. यात विजय कथावरी, शिल्पा पंडित, शितल शिरसाट, साहिल पवार यांना येवला पैठणी हे पहिले बक्षीस मिळाले. तसेच धरती दोंदे, अनुसया पीठे यांना इस्त्री, पूजा कराडे, नितीन भालेराव यांना ३ लिटर वॉटर जार, तर सचिन दिवटे, योगेश कुलवडे, सुनील पळसकर, शकुंतला पडवळ, किरण कसारे, जया धारणगावकर यांना मल्टिपर्पज बास्केट अशी बक्षिसे ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे उत्तम संयोजन अमित मेडिकल संचालक सौ राजश्री कवडे यांनी केले. या वेळी परिसरातील नागरिक व मेडिकलचे ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरोग्य साधना शिबिर
मेगा कॅम्प जवळपास ५००० रुपयांच्या टेस्ट मोफत
मोफत.. मोफत.. मोफत
२६•९•२०२५.
वार= शुक्रवार
ठिकाण..
माय हेल्थ केअर सेंटर
अमित मेडिकल वीर सावरकर नगर, म्हसोबा मंदिरासमोर
नोंदणी १०० रुपये फक्त
* थायरॉईड टेस्ट
* लिक्विड प्रोफाइल टेस्ट
* HBA1C(तीन महिन्याची अवरेज शुगर)
* P F T TEST(फुफ्फुसाची तपासणी)
* BMD(हाडाचा ठिसूळपणा )
* यूरिक ॲसिड
* मर्यादित तपासणी उपलब्ध प्रथम येणारेस प्राधान्य.

