

इंदिरानगर, ता. १४: जागतिक हृदय दिनानिमित्त किम्स मानवता हॉस्पिटल आणि इंदिरानगर जॉगर्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य शिबिर आणि ‘वॉकेथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळील सिटी गार्डनसमोर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात संगीत योगा सेशनने झाली, ज्यात अनेक नागरिकांनी सहभाग घेतला. या शिबिरात सहभागी झालेल्यांपैकी काही भाग्यवान व्यक्तींसाठी ‘लकी ड्रॉ’द्वारे मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागी नागरिकांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा उत्साह वाढविण्यात आला.


या वेळी किम्स मानवता हॉस्पिटलचे डॉ. निखिल पटेल आणि डॉ. अतुल पाटील यांनी उपस्थितांना हृदय आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला इंदिरानगर जॉगर्स क्लबचे अध्यक्ष अवधूत कुलकर्णी, महेश खेडकर, इंदिरानगर प्रजापती ब्रह्मकुमारी आश्रमाचे पदाधिकारी, अरुण मुनशेट्टीवार, विलास विधाते, श्रीवास्तव, सतीश लोहारकर, सुनील खोडे मोटकरी, राजेंद्र जाधव, मनीष बोरसे, विजय लबडे, सुहास आहेर, माजी मुख्याध्यापक सुभाष पवार, माणिक भदाणे, महेश सोनवणे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला आणि खेळाडू उपस्थित होते.

