

*नाशिक*
भारतीय संस्कृतीत रक्षाबंधन सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातही हा सण अत्यंत उदात्त हेतूने साजरा करण्यात आला. कैदी बांधवांमध्ये संस्कारांचे परिवर्तन घडवणारा हा सण ठरावा, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
“तुमच्या हातून ज्या काही चुका झाल्या असतील किंवा नसतील, त्यातून दुःखी न होता हा सण चांगल्या मार्गावर चालण्याचा दृढ संकल्प करण्याचा आहे. जीवन इतके परिवर्तनशील व्हावे की समाजालाही आश्चर्य वाटावे. येथे नियमित राजयोग ध्यान व मूल्याधिष्ठित वर्ग सुरू असणे हे खरोखरच भाग्याचे आहे. स्वतःला कैदी न समजता आपण शिकण्यासाठी आलो आहोत असे समजून कर्म करा. समाजात प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या बंधनात अडकलेला आहे; परंतु येथील शिकवण जीवनपरिवर्तन घडवणारी आहे. तुमच्या चांगल्या वर्तनातून घरच्यांनाही प्रेरणा मिळेल, अधिकाऱ्यांनाही अभिमान वाटेल. ईश्वरी बंधनातून सर्व बंधने तोडून खरी रक्षाबंधन साजरी करा. असे प्रतिपादन ब्रह्माकुमारी संस्थेच्या उपक्षेत्रीय संचालिका ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांनी मार्गदर्शन करताना केले –
कार्यक्रमाचे आयोजन कारागृह अधीक्षक अरुणा मुकुटराव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. वरिष्ठ तुरुंग अधिकारी श्रीकृष्ण भुसारे अध्यक्षस्थानी होते.
नाशिक रोड सेवा केंद्राच्या ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की,
“जीवनात शिकायत न करता ‘शुक्रिया’ करणे शिकले पाहिजे. कृतज्ञतेतूनच जीवनपरिवर्तन घडते.”


ब्रह्माकुमारी ज्योती दीदी यांनी .रक्षाबंधनाचे रहस्य स्पष्ट केले – टिळा, प्रसाद, रक्षा-सूत्र व भेटवस्तू यामागील आध्यात्मिक अर्थ सांगितला.
श्रीकृष्ण भुसारे म्हणाले –
“ब्रह्माकुमारी संस्थेचे कार्यक्रम मी अनेक कारागृहात पाहिले आहे. येथेही कैदी बांधवांसाठी योग्य मार्गदर्शन होत आहे. आज दीदींनी दिलेले अनमोल विचार नक्कीच त्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करतील. कैदी बांधवांनी या मार्गदर्शनातून प्रेरणा घेऊन जीवनपरिवर्तनासाठी प्रयत्न करावेत.”
कैदी बांधवांनीही स्वागतपर भाषणातून समाधान व्यक्त केले. “जेलमध्येच गीता पाठशाळा, ईश्वरी संस्कार-परिवर्तन चालते, ही परम भाग्याची बाब आहे,” असे त्यांनी सांगितले.
ब्रह्माकुमार दिलीप भाई यांनी सूत्रसंचालन केले. सुनीता माता, विजया माता, ब्रह्माकुमार कौस्तुभ भाई उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन तुरुंग प्रशासनातील हेमंत पोद्दार सर व बालाजी म्हात्रे सर यांनी केले.



रक्षाबंधनानिमित्त कैदी बांधवांनी विकार-त्यागाचा लिखित संकल्प करून ईश्वरी प्रसाद, सुविचार व भेटवस्तू स्वीकारली. ब्रह्माकुमारी दीदींनी प्रत्येकाला रक्षा-सूत्र बांधून जीवनात नवसंस्कारांची प्रेरणा दिली.

