
79 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कोणार्क नगर येथील नाशिक एज्युकेशनल चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सनशाइन स्टार किड्स यांच्यातर्फे मोफत डेंटल चेकअप शिबिर घेण्यात आले. नाशिक येथील सुप्रसिद्ध, पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले डॉ. युवराज गायधनी व डॉ. प्रशांत महाले यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या दाताची तपासणी केली व पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले.
लहान मुलांच्या दातांची निगा कशी राखावी, दातांचे आरोग्य कसे वाढवता येईल, दाताला कीड लागू नये म्हणून काय काय काळजी घ्यावी अशा बऱ्याचशा विषयांवर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.

शिबिराला पालक व विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
याप्रसंगी श्री. प्रशांत बडगुजर व प्रिन्सिपल सौ स्वाती बडगुजर, पालक, विद्यार्थी, शिक्षिका उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. हर्षदा खळगे, सौ. रोहिणी शिरसाठ यांनी केले व आभार प्रदर्शन सौ. नूतन पवार, सौ. माधुरी शेळके यांनी केले.

