

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मध्य विधानसभा उपाध्यक्ष या पदावर ईश्वर अहिरे यांची नियुक्ती निमित्त सत्कार कार्यक्रम*
नाशिक – राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष मा. श्री. रंजन (भाऊ) ठाकरे व मुख्य सरचिटणीस मा. श्री. संजय दाजी खैरनार शहर संघटक संतोष गोवर्धने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्र. २३ मधील सामाजिक कार्यकर्ते ईश्वर अहिरे यांची पक्षातील निष्ठा व पक्षसंघटनेतील काम बघुन नाशिक शहर (जिल्हा) अजित दादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मध्य विधानसभा उपाध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली.


राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना.श्री. अजितदादा पवार साहेब, मा. ना. श्री. छगनरावजी भुजबळ साहेब व प्रदेश अध्यक्ष मा. खा. श्री. सुनिल तटकरे साहेब यांचे विचार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ध्येयधोरणे व शासकीय योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आपण व आपले सर्व सहकारी काम करत राहाल अशा शुभेच्छा (रंजन ठाकरे) शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी दिला आहे
ईश्वर अहिरे यांचे जनसेवेचे कार्य….
राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट याचे 2012 पासून कार्यकर्ते
भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गंगेवर गोरगरिबांना शाल वाटप
नाशिक एज्युकेशन सोसायटी संचालित वळुंजे आश्रमशाळा येथे अन्नदान
श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी साबुदाणा खिचडी व चहाचे वाटप हा उपक्रम 2018 पासून सतत चालू आहे
वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये गोरगरिबांना सवलतीच्या दरात औषधी उपलब्ध करून देणे
कोरोना काळात रेमडिसेवर अनधिकृत किंमत एक लाख पर्यंत गेली होती अतिशय सवलती दरात उपलब्ध करून अनेकांचे जीव वाचवले ज्यांना बेड उपलब्ध होत नव्हती त्यांना बेड उपलब्ध करून दिले


दिनांक १३ जुलै रोजी ईश्वर अहिरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मध्य विधानसभा उपाध्यक्ष या पदावर नियुक्ती झाल्या बद्दल त्यांच्या राहत्या घरी चंद्र दर्शन सोसायटी मध्य सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी सोसायटीचे चेअरमन धनंजय शेटे यांनी सत्कार केला. सोबतच राष्ट्रवादी कॉ. चे संघटक अध्यक्ष गोवर्धने संतोष यांचा सत्कार साप्ताहिक नासिक परिसर चे संपादक दिलीप बोरसे यांनी केला, बाळू गांगुर्डे सरचिटणीस मध्य नाशिक विधानसभा यांचा सत्कार चंद्रदर्शन सोसायटीचे सचिव श्याम कोळपकर यांच्या हस्ते, किरण कळमकर राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी यांचा सत्कार चंद्रदर्शन सोसायटीचे सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, रफिक शेख पदाधिकारी यांचा सत्कार सोसायटीचे सदस्य प्रवीण गांगुर्डे यांनी केला. उपस्तित स्नेहींनी ईश्वर अहिरे यांचे औक्षण केले. सूत्र संचालन दिलीप बोरसे यांनी केले.

