24 जून मातेश्वरी जगदंबा स्मृती दिवस

MATESHWARI JAGDAMBA
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या प्रथम संचालिका मातेश्वरी जगदंबाजी त्यांच्या जीवनकार्यातून आपल्याला प्रेरणा मिळते. मातेश्वरी यांचे समग्र जीवन श्रेष्ठ कर्मांचे प्रेरणास्त्रोत आहे. अनेकानेक साधक त्यांच्या दिव्य जीवनातून प्रेरणा घेऊन आपले जीवन उज्ज्वल बनवित आहेत. 2४ जून 1965 रोजी मातेश्वरी जगदंबा यांनी आपली साकार काया त्यागून इह लोकाचा निरोप घेतला. या जगत मातेच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या जीवन कार्याचा घेतलेला हा आढावा…..
नर तू अशी करणी कर की नराचा नारायण होशील नारी तू अशी करणी कर कि नारीची श्री लक्ष्मी होशील…. असे आपल्या सुभाषितांमध्ये म्हटले आहे. परंतु कोणते कर्म केल्याने आपणास अशा प्रकारे देवत्व प्राप्त होऊ शकते या प्रश्नाचे उत्तर आपणास प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या प्रथम संचालिका मातेश्वरी जगदंबा त्यांच्या जीवनकार्यातून मिळते. मातेश्वरी चे समग्र जीवनच कर्माचे परिणाम होत आहे अनेकानेक साधत त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आपले जीवन उज्ज्वल बनवित आहेत.
मातेश्वरी जगदंबा यांचे पूर्वाश्रमीचे नाव राधे होते. सन 1919 मध्ये अमृतसर येथे पोकरदास व रुचा या दांपत्याच्या घरी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सोन्या-चांदीचे व देशी तुपाचे ठोक व्यापारी होते. एकदा व्यापारात अचानक झालेल्या नुकसानीमुळे पोकरदास यांना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू येतो. यामुळे राधा आपल्या आई व भावंडांसोबत हैदराबाद येथे आजोळी येतात. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे साकार संस्थापक प्रजापिता ब्रह्मा बाबा यांनी 1936 या काळात आपल्या राहत्या घरातच विद्यालयाची मुहूर्तमेढ केली होती. त्या काळी या संस्थेला ओम मांडली म्हणून ओळखण्यात येई. सतरा वर्षाच्या वयात राधा आपल्या आईसोबत या ओम मंडलीच्या संपर्कात येते. पति निधना नंतर वैधव्य प्राप्त झाल्यामुळे राधे च्या आईला खूप दुःख झाले होते. पण ओम मांडलीत येऊन त्यांना आपल्या जीवनात आशेचा किरण दिसला. राधेला सुद्धा या सत्संगात येऊन दिव्यत्वाची अनुभूती होते. त्यानंतर राधा क्षणाचाही विलंब न करता उर्वरित आयुष्य स्व कल्याण व विश्वकल्याणासाठी वाहण्याचा आपला निश्चय पक्का करते. राधे कडील आपलेपणा, दया भावनेमुळे अल्पावधीतच त्या सत्संगींच्या आदरणीय बनतात. वयाने लहान असून सुद्धा त्या सर्वांना मातृप्रेम करतात. यामुळे सर्व सत्संगी त्यांना प्रेमाने मम्मा संबोधतात. त्यांची स्नेहगंगा इतकी अपार होती की त्यांची आई व वरिष्ठ गण सुद्धा त्यांना मातेसम वाटे. ईश्वरीय संकेतानुसार ब्रह्मा बाबा एक ट्रस्ट स्थापन करून आपली सर्व चल व अचल संपत्ती या ट्रस्ट ला दान करतात. याचेच रूपांतर पुढे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय असे होते. या संस्थेच्या प्रथम संचालिका बनण्याचा मान मम्मा ला मिळतो.
ईश्वरीय जीवनाच्या कारकिर्दीत मम्माने अनेक घटनांमधून आपल्या अंतर गुणांची प्रचिती करून दिली. यात न्यायालयात घडलेली घटना विशेष नोंद घेण्यासारखी आहे. त्या काळात संस्थेचे नियम पवित्रतेच्या धारणेचा अनेक विरोधक विरोध करीत असत. येथे येणाऱ्या सत्संगीना वाळीत टाकण्यात येत असे. सत्संगींच्या घरा बाहेर आंदोलन करण्यात येत असे. हा सर्व प्रकार एकदा न्यायालय प्रविष्ट होतो. न्यायाधीश या प्रकाराची शहानिशा करण्यासाठी तेथे मम्ममाला बोलावतात. आपल्या मम्मा धीरगंभीर वादविवादातून न्यायाधीशांना सुद्धा निरुत्तर करतात. परमात्मा विषयी असलेली निष्ठा व सर्वांप्रती असलेल्या शुभ भावनेमुळे न्यायाधीशांना मम्माचा युक्तिवाद पटतो. सत्संगी ना हकनाक त्रास दिल्याबद्दल विरोधकांना न्यायाधीश फटकारतात.
अशा स्नेहमूर्त मामानी आपल्या 28 वर्षाच्या ईश्वरीय सेवेच्या काळात आपल्या सान्निध्यात येणार्या प्रत्येक साधकास ईश्वरी शक्तीने ओतप्रोत केले. याच मम्माने भक्तांच्या सुद्धा मनात आपले स्थान मातेश्वरी जगदंबा म्हणून अढळ केले. प्रजा पिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाची धुरा सांभाळणाऱ्या याच मम्मा भविष्यात येणाऱ्या स्वर्णिम युगात श्री लक्ष्मी च्या रूपाने विश्वाची धुरा सांभाळणार आहेत. वयाच्या चाळीसाव्या वर्षी म्हणजेच २४ जून 1965 रोजी मम्माने इह लोकाचा निरोप घेतला…. त्यांच्या दिव्या स्मृतीस कोटी कोटी…. नमन …… ओम शांती ….
ब्रह्माकुमार दिलीप
(MCJ, dip. in PR Mgmt.)
मध्यम समन्वयक, ब्रह्माकुमारीज मीडिया प्रभाग, नाशिक.
समन्वयक, मूल्यनुगत मीडिया अभिक्रम समिति, नाशिक.
मो. 8830781810, whats app – 9423145198


Hi, this is a comment.
To get started with moderating, editing, and deleting comments, please visit the Comments screen in the dashboard.
Commenter avatars come from Gravatar.