शनेश्वर महाराज यात्रेत “व्यसनराजका खात्मा” चे सादरीकरण*

शनेश्वर महाराज यात्रेत “व्यसनराजका खात्मा” चे सादरीकरण*
व्यसन राज मालिकेतील एक दृश्य
शनेश्वर महाराज यात्रेत “व्यसनराजका खात्मा” चे सादरीकरण*

*शनेश्वर महाराज यात्रेत “व्यसनराजका खात्मा” चे सादरीकरण*

निरहाळे फत्तेपूर ता. संगमनेर जि. अहील्यानगर - येथे शनेश्वर महाराज यात्रे निमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, नांदूर शिंगोटे उपसेवाकेंद्रातर्फे बुधवार दिनांक 29जानेवारी 2025 रोजी अध्यात्मिक चित्र प्रदर्शनी व व्यसनमुक्ती नाटिका “व्यसन राजका खात्मा” चे सादरीकरण करण्यात आले. 

यात्रेत येणाऱ्या हजारो भाविक अबाल वृद्ध, शालेय विद्यार्थी माता भगिनींनी या नाटिकेतून अध्यात्मिक संदेश व व्यसनमुक्तीची प्रेरणा प्राप्त केली. नाटिकेच्या स्थळी अनेकांनी आपले व्यसन सोडण्याचा संकल्प केला. व्यसनराज सोबतच तंबाखू, मद्य, घुटका, सिगारेट, पान मसाला इत्यादी पात्रांनी प्रेक्षकांना अंतर्मुख होऊन विचार करण्यासारखे संवाद दिले. या पात्रांच्या वेशभूषेतून अनेकांनी मनोरंजनाचा अनुभव केला. व्यसनांचे पात्र प्रेक्षकांना इतके भावले की ते पात्र समोर आल्याबरोबर सर्वांनी टाळ्यांच्या गजरात सर्व पात्रांचे स्वागत केले. पाच व्यसनांच्या पात्रात नाशिक येथील बीके सुनील श्रावगे, बिके गोविंद भिडे, बी के लहू भाई, बिके विलास सूर्यवंशी, बीके सोमनाथ खोडे, इत्यादी ब्रह्माकुमार उपस्थित होते तर व्यसनराज च्या भूमिकेत बीके स्वप्निल सोनवणे यांनी उत्तम अभिनय साकारला. ब्रह्माकुमारी भगिनीचा सुंदर अभिनय ब्रह्माकुमारी उज्वला बहन यांनी साकारला. बी के हिरालाल मथुरे यांनी नाटिकेचे उत्तम समन्वय केले. 

कोपरगाव येथील ब्रह्माकुमारी शितल दीदी यांनी ईश्वरीय संदेश देऊन ब्रह्माकुमारी संस्थेचा साप्ताहिक राजयोग कोर्स करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. सदरच्या चित्रा प्रदर्शनी व व्यसनमुक्ती नाटिकेसाठी नांदूर शिंगोटे येथील ब्रह्माकुमार मारुती भाई काकड व ब्रह्माकुमारी ज्योत्स्ना माता काकड यांनी अथक परिश्रम केले.