व्यसनाधीनता ही समाजाला लागलेली कीड- मुख्याध्यापक श्री पिके थोरात

व्यसनाधीनता ही समाजाला लागलेली कीड- मुख्याध्यापक श्री पिके थोरात

व्यसनाधीनता ही समाजाला लागलेली कीड- मुख्याध्यापक श्री पिके थोरात सर यांचे प्रतिपादन

2500 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

नाशिक- प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय मुंबई नाका सेवाकेंद्राद्वारे म वि प्र स च्या मराठा हायस्कूल मध्ये व्यसनमुक्ती नाटिका व प्रवचन द्वारे विद्यार्थ्यांमध्ये दिनांक 21 जानेवारी रोजी जनजागृती करण्यात आली.  याप्रसंगी ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे ब्रह्माकुमारी विनादिदी यांच्या सशक्त नियोजनात ब्रह्माकुमारी उज्वला बहेन, बी के  हिरालाल मथुरे , बी के दत्ता चांडोले , बी के सुनील श्रावगे, बिके सोमनाथ खोडे, बी के शांताराम पाटील  विलास सूर्यवंशी बी के मधुकर मराठे, इत्यादींनी व्यसनमुक्ती नाटिका मध्ये सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना व्यसनांपासून होणाऱ्या घातक परिणामांची माहिती दिली. 

व्यसनाधीनता ही समाजाला लागलेली कीड आहे आजची सर्वात मोठी सामाजिक समस्या आहे जी देशाच्या प्रगतीतील सर्वात मोठा अडसर आहे ज्यामुळे आजचा तरुण हा दिशाहीन होत आहे मुलांची घसरण होताना दिसत आहे अशा परिस्थितीत आपण समाजाची गरज ओळखून समाजाला दिशा देण्याचे महान कार्य ब्रह्मा कुमारी संस्थेने हाती घेतले आहे आपल्या या समाजप्रबोधनातून  तरुण लोक व्यसनाधीनतेपासून परावृत्त नक्किच होतील असे प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापक श्री पिके थोरात सर यांनी केली. 

कार्यक्रम 2 सत्रं मधून घेण्यात आला यात

5 वी ते 7वी  व 8 वी ते 10 वी आजच्या विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती नाटिका  दाखवण्यात आली. या नाटीकेतील व्यसन राज्य पात्र बघून विद्यार्थ्यांनी खूप आनंद लुटला महान सिगारेट गुटखा तंबाखू दारू इत्यादी व्यसनांच्या पात्रातून ब्रह्माकुमारी संस्थेच्या सदस्यांनी खूप चांगल्या प्रकारे व्यसनमुक्तीचा संदेश प्रसारित केला.  50 पेक्षा जास्त कर्मचारी वृंद व शिक्षक वृंद तसेच अडीच हजार  विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेऊन व्यसनाधीनतेपासून परावृत्त होण्याचा संकल्प केला.